दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरोघरी रांगोळी, फुलांची सजावट करून पणत्यांची आरास केली जाते. सामान्य लोकांप्रमाणे मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळींनी सुद्धा कुटुंबीयांबरोबर दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य दिलं आहे. अनेक कलाकारांनी दिवाळीचे खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : ट्रान्सजेंडर असल्याने ढाब्यावर नाकारण्यात आला प्रवेश; रोडीज फेम नीरजा पुनिया म्हणाली, “तुमच्या पितृसत्ताक…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बनेने चाळीतल्या दिवाळीची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. निखिल हास्यजत्रेमुळे घराघरांत लोकप्रिय झाला आहे. नुकतीच त्याने ‘बॉईज ४’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. एवढी प्रसिद्धी मिळवूनही निखिल बने आताही भांडूपच्या एका चाळीतील घरात राहतो.

निखिलने चाळीतल्या दिवाळीची खास झलक या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सगळ्यांच्या घरासमोर सारखेच आकाश कंदील लावले असून घरोघरी बायका एकत्र बसून रांगोळ्या काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला निखिलने “एकोप्याची दिवाळी…” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : सई ताम्हणकरच्या नव्या आलिशान घरात दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम! प्रिया बापटसह पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निखिल बनेने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत “अशी दिवाळी सर्वत्र साजरी होवो..”, “हीच खरी दिवाळी”, “चाळीतली दिवाळी” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.