सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे घराघरात प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमातील अनेक विनोदी कलाकारांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला विनोदी कलाकार पृथ्वीक प्रताप याने नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्याने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीक प्रताप हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दिवाळीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचे सांगितले आहे. दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी शिवतीर्थावर भव्य अशी आकर्षक रोषणाई केली जाते. याचे निमित्त साधत अनेक कलाकारांनी शिवाजी पार्क या ठिकाणी हजेरी लावली होती. त्यानंतर आता पृथ्वीकनेही राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. याचे काही फोटो आणि एक पोस्ट त्याने शेअर केली आहे.
आणखी वाचा : “पोलिसांनी तातडीने मदत पाठवली म्हणून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न, फेसबुक पोस्टद्वारे सांगितला थरारक अनुभव

पृथ्वीक प्रतापची इन्स्टाग्राम पोस्ट

दीपोत्सव २०२२ च्या निमित्ताने…

२००६-०७ ला विक्रोळीच्या म्हात्रे मैदानाबाहेर गर्दीत उभं राहून एकलेलं ‘मनसे’ साठीचं पहिलं भाषण…
कॅालेजच्या पहिल्या वर्षी नवा मोबाईल मिळाल्यावर पहिली रिंगटोन त्याच भाषणाची…

किर्ती कॅालेज मधून ग्रॅज्युएट झाल्यावर पार्काच्या कट्ट्यावर सुद्धा यांच्याच भाषणांची पारायणं केली…
अत्यंत आवडता वक्ता… त्यांनी केलेली अनेक राजकारण्यांची मिमीक्री तर सतत पाहात राहावी…मॅनेरीजम्स तर शिकत राहावेत इतके लाजवाब.
कौतुक करतील, खांद्यावर हात ठेवतील, चहा ला बोलवतील असं तर स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण आज दीपोत्सवाच्या निमित्ताने हे सुद्धा घडलं.
आणि या सगळ्याचं श्रेय जातं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ला. या कार्यक्रमाने खूप काही दिलंय. अजून असे अनेक अनुभव वेचायचेत. तूर्तास.. माझी FANBOY MOMENT जगतो.

अ’राज’कीय, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते…’ फेम मधुराणी प्रभुलकरची फसवणूक, शिवसेना नेत्याच्या हॉटेलमध्ये हजारोंचा गंडा

दरम्यान अभिनेता पृथ्वीक प्रताप याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विनोदी पात्र साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटातही त्याने काम केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap meet raj thackeray instagram post nrp
First published on: 28-10-2022 at 09:21 IST