‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख मिळाली. प्रेक्षक या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतात. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून शिवाली नावारूपाला आली. आता तिने तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगितला आहे.

शिवाली परबचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. शिवालीदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वी तिने शाहरुख खानवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. तर आता ती शाळेत असताना एका मुलाने तिला प्रपोज केलं होतं आणि त्यावर तिने काय प्रतिक्रिया दिली होती हे शेअर केलं आहे.

आणखी वाचा : “मला तो प्रचंड आवडतो आणि…,” क्रशचं नाव सांगत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने व्यक्त केली मनातली इच्छा

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी आतापर्यंत कधीही कोणाला प्रपोज केलेलं नाही. पण शाळेत असताना मला एका मुलाने प्रपोज केलं होतं. मी आता जशी बिनधास्त आहे तशी तेव्हा नव्हते. माझ्या शालेय वयात मी खूप घाबरी होते. शाळेत असताना मला एका मुलाने विचारलं होतं पण माझ्या शामळू स्वभावामुळे मी त्याला काहीही प्रतिक्रिया दिली नाही.”

हेही वाचा : “सई ताम्हणकर खूप बोल्ड, तर प्राजक्ता माळी…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा अभिनेत्रींबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवालीचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तिने शाहरुख खानवर तिचं क्रश आहे आणि तिला तो प्रचंड आवडतो, असं म्हणत त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती