‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळाली. हास्यजत्रेच्या स्किटमधून अभिनयाची छाप पाडणाऱ्या आणि छोट पॅकेट बडा धमाका ठरलेल्या दत्तू मोरेलाही याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली.

दत्तू मोरेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. दत्तू त्याच्या चाहत्यांसाठी एक सरप्राइज घेऊन आला आहे. हास्यजत्रा फेम दत्तूला लॉटरी लागली आहे. दत्तूला एक हिंदी जाहिरात मिळाली आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दत्तूने ही गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा>>तुनिषा शर्माचा कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान कोण आहे? मालिकेत साकारतोय ‘अलिबाबा’ची भूमिका

दत्तूने हिंदी जाहिरातीतील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या जाहिरातीत त्याने कैद्याची भूमिका साकारली आहे. तुरुंगातील कैद्यांच्या गणवेशात तो फोटोमध्ये दिसत आहे. “माझी पहिली हिंदी जाहिरात. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे”, असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. दत्तूच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा>> “आई-वडिलांचा विचार येत नाही का?”, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट

हेही पाहा>>Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील चाळीत राहणारा सामान्य कुटुंबातील दत्तू यशाचं उंच शिखर गाठताना दिसत आहे. दत्तूच्या चाहत्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे.