‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय शो घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. अनेक विनोदवीरांना हास्यजत्रेमुळे लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतील कलाकारांची ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिकाही गाजली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ९०च्या दशकातील पोस्ट ऑफिसमधील काळ या मालिकेच्या निमित्ताने दाखविण्यात आला होता.

अल्पावधीतच लोकप्रियता मिळालेल्या या मालिकेने अवघ्या तीनच महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. २ एप्रिलला पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेच्या निमित्ताने कलाकारांनी ९०च्या दशकातील फोटो पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला. सध्या हास्यजत्रेतील एका अभिनेत्रीचा फोटो बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेली ईशा डे आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने शेअर केला बालपणीचा फोटो, नेटकरी म्हणाले “फक्त दाढी…”

हेही पाहा>> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो

ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन १९९७ सालातील काही फोटो शेअर केले होते. या फोटोला तिने “‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेने आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं. तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो…तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा, ” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> Video: भर गर्दीत चाहत्याने पकडला अजय देवगणचा हात, नंतर अभिनेत्याने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशाने लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिने मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ व ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये ती दिसली होती. बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमध्येही ईशा झळकली होती.