फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचला. गौरव त्याच्या अफलातून विनोदी अभिनय शैलीने प्रेक्षकांना भूरळ पाडतो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरव प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडणाऱ्या या विनोदवीराचा आज वाढदिवस आहे.

गौरवच्या वाढदिवसानिमित्त हास्यवीर समीर चौघुले यांनी खास पोस्ट लिहिली आहे.  समीर चौघुलेंनी गौरवचा हास्यजत्रेच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. गौरवचा फोटो पोस्ट करत चौघुलेंनी त्याला खास कॅप्शनही दिलं आहे. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गौरव देविदास मोरे…भावा…तू तो अपना शेर है…तुझ्या बद्दल मी काय लिहिणार!! अत्यंत वेगळी विनोदाची शैली असलेला आमचा गौऱ्या अल्पावधीतच जगातल्या मराठी माणसांच्या गळ्यातला ताईत झालाय”, असं म्हणत चौघुलेंनी गौरवचं कौतुक केलं आहे.  

हेही वाचा>> शाहिद कपूरच्या घरी भाड्याने राहणार कार्तिक आर्यन, एका महिन्याचं भाडं आहे तब्बल…

हेही वाचा>> राखी सावंतचा पती आदिल खान आहे कोट्यधीश; जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

पुढे त्यांनी “आज आमच्या गौऱ्याचे आबाल वृध्द फॅन आहेत यातच त्याची मेहनत आणि कामावरील प्रेम दिसून येते…तुझ्यातली उत्स्फूर्तता आणि तुझ्यावर रसिकांचे असलेले प्रेम कायम राहो…आणि तुला जे जे आयुष्या कडून हवंय ते दुपटीने मिळो…भावा…वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या या पोस्टवर गौरवने “दाद लव्ह यू” अशी कमेंट केली आहे.

हेही पाहा>> Photos: अभिनेत्रीचा ‘तो’ एक व्हिडीओ आणि राखी सावंतला अटक, नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव मोरे हा एक गुणी अभिनेता आहे. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेल्या गौरवने मराठी चित्रपटांतूनही अभिनयाची छाप पाडली आहे. हवाहवाई या चित्रपटात गौरव झळकला होता. नुकतंच हास्यजत्रेच्या टीमचा दुबई दौरा पार पडला. गौरवने दुबईतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.