गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. येत्या काळातही काही मराठी कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतील नेत्रा म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने पहिल्या केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली.

अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षा तावडे लग्न करणार आहे. सध्या दोघांचं केळवण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा अतुलने तितीक्षा व सिद्धार्थचं केळवण केलं. दोघांच्या केळवणाचा गोड फोटो शेअर करत अभिनेत्रीने त्याला “केळवण…माझे पाहुणे सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडे” असं कॅप्शन दिलं होतं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने दोघांचं केळवण केलं आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी यांना दिल्या लग्नाच्या खास शुभेच्छा, नवविवाहित जोडप्यासाठी पाठवलं पत्र

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून खळखळून हसवणारी ईशा डे हिने तितीक्षा व सिद्धार्थचं केळवण केलं. यावेळी ईशाच्या सोबतीला अभिनेत्री आकांक्षा गाडेही होती. ईशाने केळवणाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘केळवण ऑफ द पावर कपल’, असं कॅप्शन या फोटोला तिने दिलं आहे.

हेही वाचा – दगडूच्या प्राजूला लागली हळद; होणाऱ्या बायकोचे हळदीचे फोटो पाहून प्रथमेश परब म्हणाला, “चल पटकन…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तितीक्षा व सिद्धार्थचं पहिलं केळवण अभिनेत्रीची बहीण खुशबू तावडेने केलं होतं. आता दोघं कधी लग्नबंधनात अडकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दोघांनी अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नाही. पण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोघं लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे.