‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने अनेक गुणी कलाकार मराठी सिनेसृष्टीला दिले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. यातील एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक आज लोकप्रिय झाला आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याचा ३० नोव्हेंबरला वाढदिवस होता. पृथ्वीकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. या संबंधित व्हिडीओ पृथ्वीकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता पृथ्वीक प्रतापने वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांनी केलेल्या गर्दीचा व्हिडीओ काही तासांपूर्वीच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोणी पृथ्वीकचा फोटो, व्हिडीओ काढताना दिसत आहे, तर कोणी त्याला शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या मागे पृथ्वीकने त्याचा आवडता सुपरस्टार शाहरुख खानचं ‘चांद तारे’ हे गाणं लावलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “माझ्या लग्नाला सासरकडून होता विरोध”, कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “मला कायम…”

पृथ्वीकच्या या व्हिडीओवर कलाकार आणि चाहत्यांनी लाइक्स, प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने लिहिलं आहे की, “शाहरुख खान सारखं वाटतंय. चेहऱ्यावरील हास्य पाहा…” तसेच एका चाहत्याने लिहीलं आहे की, “भाऊ… लवकरच ही गर्दी खूप मोठी होईल…”

हेही वाचा – काय सांगता! ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कधी, कुठे पाहता येणार? घ्या जाणून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पृथ्वीकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात पृथ्वीकच्या साथीला अभिनेता प्रथमेश परब दिसणार आहे.