scorecardresearch

“इंग्रजी चालणार नाही, मराठीत…” चाहत्याच्या कमेंटवर प्रियदर्शनी इंदलकरचं उत्तर, म्हणाली “हे तुम्ही…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरचं चाहत्याला उत्तर

priyadarshini indulkar
प्रियदर्शनी इंदलकरचं चाहत्याला उत्तर. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या तिच्या ‘फुलराणी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या प्रियदर्शिनीने ‘फुलराणी’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर २२ मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत आहे. ‘फुलराणी’तील प्रियदर्शनीच्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी प्रियदर्शनीसाठी खास पोस्ट लिहित तिचं कौतुक केलं आहे. अभिनेता ओंकार राऊतनेही प्रियदर्शनीबरोबरचा फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. या पोस्टला त्याने “अभिनंदन आणि शुभेच्छा प्रियदर्शनी…तू खरंच खूपच छान काम केलं आहेस! सुबोध भावे आणि विक्रम गोखले यांच्याबरोबर उभं राहणं, अभिनय करणं हे सोपं नाही. पण तू ते लीलया पार पाडलं आहेस! मला तुझा खूप अभिमान आहे आणि आनंदही. असाच प्रत्येक क्षणांचा आनंद घे !! सगळ्यांनी फुलराणी चित्रपट गृहात जाऊन पहा!!” असं कॅप्शन दिलं होतं.

हेही वाचा>> प्राजक्ता माळीचं सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका, व्हिडीओत दिसली झलक

ओंकारने इंग्रजीमधून पोस्टला कॅप्शन दिल्याने एका चाहत्याने पोस्टवर कमेंट केली होती. “इंग्रजी चालणार नाही, मराठीत कॅप्शन लिहायचं”, असं चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं होतं. परंतु, चाहत्यानेही इंग्रजीतूनच कमेंट केली होती. चाहत्याच्या या कमेंटवर प्रियदर्शनीने उत्तर दिलं आहे. “हे तुम्ही इंग्रजीमध्येच लिहिलं आहे” अशी कमेंट प्रियदर्शनीने केली आहे. प्रियदर्शनीच्या या कमेंटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

हेही वाचा>> …अन् संजय राऊतांनी केलेलं कंगना रणौतच्या चित्रपटाचं कौतुक, म्हणाले “झाशीच्या राणींवर…”

priyadarshini reply to fan

हेही वाचा>> “त्याने शिवीगाळ केली, गाडीचं पॅनेल तोडलं” एमसी स्टॅनच्या मॅनेजरवर अब्दु रोझिकचे आरोप, म्हणाला “मुस्लीम भाई…”

‘फुलराणी’ चित्रपटात प्रियदर्शनीबरोबर अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. याबरोबरच अश्विनी कुलकर्णी, मिलिंद शिंदे, सुशांत शेलार व दिवंगत अभिनेते विक्रम गोखलेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 17:12 IST

संबंधित बातम्या