‘बिग बॉस मराठी’ गाजवणारे व ‘सिंधुताई माझी आई’ यामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे किरण माने लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एक विनोदवीर दिसणार आहे. तोही साताऱ्याचाच आहे आणि त्याचं आडनावही मानेच आहे. होय, रोहित माने किरण मानेंबरोबर एका सिनेमात दिसणार आहे. खुद्द किरण माने यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.

अब्जाधीश उदय कोटक यांच्या मुलाने माजी मिस इंडियाशी बांधली लग्नगाठ, शाही विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

किरण माने यांनी फेसबुकवर काही फोटो व एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “रोह्या भेटल्या-भेटल्या म्हन्ला, “अहो किरण सर, चाहते सेल्फी काढायला येतात, तवा कुनीतरी एक प्रश्न हमखास इचारतं, किरण मानेंचे तुम्ही नातेवाईक का?’
मी म्हन्लं अरे मलाबी इचारत्यात, “रोहित माने तुमचा कोन?” मी सांगतो, “लहान भाऊ.” रोह्यानं मिठीच मारली.
हास्यजत्रानं मराठीला जी अनमोल रत्नं दिली, त्यातलं हे एक रत्न.
…पहिल्यांदाच भेटलो, पन लै दिवसांची ओळख असल्यागत मैत्री झाली. एकतर दोघंबी एम.एच.अकरा… आन् दुसरं म्हन्जे दोघंबी काळजात ‘नाटक’ जपणारे !
आता आम्ही अस्सल सातारी ‘माने बंधू’ मिळून एक पिच्चर करतोय. नादखुळा विषय, भन्नाट स्टोरी, जबराट भुमिका. दोन किरानिष्ट बोड्याचे अतरंगी सातारकर एकत्र आल्यावर जाळ धूर व्हायचा त्यो हुनारच हाय.
बाकी निर्माता, लेखक, दिग्दर्शक, इतर सहकलाकार याबद्दल हळूहळू सांगेन सविस्तर. आत्ता थोडी उत्सुकता तर तानूद्या की भावांनो. नाय का?
पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रोहित माने लवकरच प्रसाद खांडेकर यांच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात दिसणार आहे. तर किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी आई’ मालिकेत काम करत आहेत. प्रेक्षकांना येत्या काळात दोन सातारकर किरण माने व रोहित माने एकाच चित्रपटात दिसतील. या चित्रपटाबाबत अधिक माहिती येत्या काही दिवसांत कळेल.