छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातल्या घराघरात या कार्यक्रमाचे चाहते आहेत. हास्यजत्रेतील विनोदवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. याच कार्यक्रमातून समीर चौगुलेही प्रसिद्धीझोतात आले. विनोद अचूक टायमिंग साधत अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना हसवणाऱ्या समीर चौगुलेंचा चाहता वर्गही मोठा आहे.

समीर चौगुले सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आगामी प्रोजक्टबद्दलही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टद्वारे माहिती देत असतात. नुकताच समीर चौगुलेंनी तरुणपणीचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी ‘क्या है रुमानी’, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा >> महेश बाबूला वडिलांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवायचा होता, पण त्याआधीच…

हेही वाचा >> Shraddha Murder Case: ‘डेक्सटर’ वेब सीरिज पाहून केले प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे; पण या ‘Dexter’ ची कथा आहे तरी काय?

समीर चौगुलेंनी शेअर केलेल्या या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी हास्यजत्रेच्या स्किटमधील डायलॉग कमेंटमध्ये लिहिले आहेत. एकाने चाहत्याने “रुमानी क्या है, क्या है रुमानी”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “हमरे को तुमरे को”, असं म्हणत कमेंट केली आहे. एका चाहत्याने प्राजक्ता माळीचा “व्वा दादा व्वा”, हा डायलॉग कमेंटमध्ये लिहला आहे.  

samir choughule

हेही वाचा >> सारा खानला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर शुबमन गिलने सोडलं मौन, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर चौगुलेंनी नाटक व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात ते झळकले होते. ‘चंद्रमुखी’, ‘आजचा दिवस माझा’, ‘पेईंग घोस्ट’ या चित्रपटांतही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.