‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात या कार्यक्रमाचे चाहते आहेत. या शोमधील हास्यवीरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. हास्यजत्रेच्या स्किटमधील अनेक डायलॉगही चाहत्यांच्या ओठी असतात.

हास्यजत्रेतील कोहली फॅमिलीही प्रेक्षकांची आवडती आहे. प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेरराव, प्रियदर्शनी व समीर चौगुले कोहली फॅमिलीचं स्किट सादर करतात. या स्किटमधील प्रत्येक वाक्याचा शेवट ‘ल’ या अक्षराने होतो. तालासुरात व विनोदाचं अचूक टायमिंग साधत सगळेच हास्यवीर या स्किटमध्ये धमाल घडवून आणतात.

हेही वाचा>>“स्वघोषित मावळे माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा लावून…” केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

अगदी काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेल्या हास्यजत्रेतील या कोहली फॅमिलीची लोकप्रियता वाढत चालली आहे. सोशल मीडियावर याचे अनेक रील्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हास्यजत्रेच्या चाहत्यांनी असाच एक भन्नाट रील व्हिडीओ कोहली फॅमिलीवर बनवला आहे. हा व्हिडीओ हास्यवीर समीर चौगुलेंच्याही पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा>>Bigg Boss Marathi: विकास सावंत घराबाहेर पडताच ढसाढसा रडले किरण माने; भावूक होत म्हणाले “ईक्या लेका…”

हेही वाचा>> “माझी मुलं मुस्लिम…” बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना देवोलिनाचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर चौगुलेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हास्यजत्रेतील कोहली फॅमिलीचा चाहत्यांनी बनवलेला मजेशीर रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “हे कमाल आहे. खूपच मस्त क्रिएटिव्हिटी. धन्यवाद”, असं कॅप्शनही दिलं आहे. चौगुलेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.