‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीनं पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अभिनेत्री शिवाली परबला सुद्धा या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली. अभिनय आणि कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नुकतंच शिवालीचं नवं गाणं ‘पायल वाजे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर कोण जास्त रिटेक घेतं? अर्जुनने केला खुलासा, म्हणाला…

‘पायल वाजे’ या नव्या गाण्याच्या निमित्ताने नुकताच शिवाली परबने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिच्या गाण्याचे नाव ‘पायल वाजे’ असल्याने तुला कोणी पैंजण गिफ्ट दिले आहेत का? असा प्रश्ना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत शिवालीने हास्यजत्रेच्या सेटवरील लाडक्या नमा ताईने पैंजण गिफ्ट दिल्याचं सांगितलं.

हेही वाचा : “मुंबईकरांसाठी नाश्ता, रात्रीचं जेवण हे सगळं…”, प्रसाद ओकने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

शिवाली परब म्हणाली, “मला पैंजण घालायला खूप आवडतात. मी अगदी वेस्टर्न कपड्यांवर सुद्धा आवडीने पैंजण परिधान करते. या पैंजणांची सगळ्यात भारी आठवण म्हणजे, मला आजवर एकाही मुलाने पैंजण गिफ्ट दिलेले नाहीत. माझ्या वाढदिवसाला नमा ताईने (नम्रता संभेराव) मला पैंजण गिफ्ट दिले होते. माझ्याकडे आता तेच पैंजण आहेत.”

हेही वाचा : जेव्हा तुझी मंगळागौर होईल, तेव्हा? ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हास्यजत्रेशिवाय शिवालीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘पायल वाजे’ या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.