छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवून गौरवने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अफलातून अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरव प्रेक्षकांना खळखळवून हसवतो.

गौरवने कलाविश्वात त्याच्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच स्वत:ची ओळख निर्माण केली. अनेक कॉमेडी शोमध्ये सहभागी झालेल्या गौरवला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे खरी ओळख मिळाली. हास्यजत्रेतून प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणाऱ्या गौरवची एका हिंदी जाहिरातीत वर्णी लागली आहे. गौरवने त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरुन या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा >> पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल; फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पूनम पांडे व शर्लिन चोप्रावर अश्लील व्हिडीओ बनवल्याचे आरोप

गौरवला मिळालेली जाहिरात ही घराचे रंगकाम करण्यसाठी वापरण्यात येणाऱ्या पेंट कंपनीची आहे. या जाहिरातीत गौरव त्याच्या स्टाइलमध्ये पेंट कंपनीच्या रंगाचं महत्त्व पटवून देताना दिसत आहे. गौरवला जाहिरातीत पाहून त्याचे चाहतेही सुखावले आहेत. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला आहे.

हेही पाहा >> Photos: “…म्हणून छत्रपती शिवाजीमहाराजांवर चित्रपट काढण्याची हिंमतच होत नाही” राज ठाकरे असं का म्हणाले?

हेही वाचा >> Drishyam 2 Box Office Collection: चौथ्या दिवशी ‘दृश्यम २’च्या कमाईत घट; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव याआधी मराठी चित्रपटातही झळकला होता. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात गौरव दिसला होता. त्यानंतर आणखी एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्ताने गौरव लंडनलाही गेला होता. तेथील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.