‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरे प्रकाशझोतात आला. तो या कार्यक्रमापुरतीच मर्यादीत राहिला नाही. तो आता मराठी चित्रपटांमध्येही काम करताना दिसत आहे. ‘हवाहवाई’ या मराठी चित्रपटामध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी त्याने भरत जाधव यांच्यासह एका नव्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं.

आणखी वाचा – Video : …अन् अचानक वनिता खरातच्या घरी पोहोचला ओंकार भोजने, अभिनेत्रीला मिठी मारताना पाहून तिच्या नवऱ्याने काय केलं? पाहा व्हिडीओ

आता गौरवने एक पाऊल पुढे टाकलं आहे. म्हणजेच गौरवच्या चाहत्यावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गौरवचे सोशल मीडियावर फॉलोवर्स वेगाने वाढत आहेत. याची चक्क इन्स्टाग्रामलाही दखल घ्यावी लागली. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टद्वारे त्याने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. गौरवच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला आता ब्ल्यु मार्क मिळाला आहे. म्हणजेच त्याचं अकाऊंट आता अधिकृत झालं आहे. याबाबत तो म्हणाला, “अखेरीस इन्स्टाग्रामनेही माझी दखल घेतली. हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. नेहमीच मी तुमचा आभारी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – रितेश देशमुखच्या ‘वेड’मुळे मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावली, ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट कायम, आतापर्यंतची कमाई किती?

गौरवच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. तसेच गौरवचे आतापर्यंत १ लाख ९८ हजार फॉलोवर्स झाले आहेत. शिवाय अभिनेत्री शिवाली परबचंही इन्स्टाग्राम अकाऊंट ऑफिशिअल झालं आहे. शिवालीचे १ लाख ७७ हजार फॉलोवर्स झाले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची क्रेझ आता वाढत आहे.