‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता अगदी प्रत्येकाला खळखळून हसवतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. अगदी सामान्य कुटुंबातील हा मुलगा आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. निखिलने सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – “हे तुला शोभतं का?” विद्या बालनचं न्यूड फोटोशूट, ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनावर

निखिल सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतो. तसेच कामाविषयी आणि खासगी आयुष्याबाबत तो सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतो. आताही त्याने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील खास मित्राने निखिलला चक्क सरप्राइज दिलं आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर प्रियदर्शनीने सोडंल मौन, म्हणाली, “मैत्री वाढली आणि…”

पाहा फोटो

अभिनेता पृथ्विक प्रतापने निखिलला खास सरप्राइज दिलं. पृथ्विकने निखिलला आदिदास या कंपनीचे शूज गिफ्ट केले. हे पाहून निखिल अगदी भारावून गेला. शूजचे फोटो त्याने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. तसेच पृथ्विकवर त्याचं असलेलं प्रेम व्यक्त केलं. या फोटोमधूनच या दोघांमध्ये किती घट्ट मैत्री आहे हे दिसून आलं.

निखिल म्हणाला, “कोणतीही कल्पना नसताना हे गिफ्ट समोर येणं म्हणजे सर्वात मोठा आनंद आहे. पृथ्विक तू माझ्यासाठी अगदी योग्य गिफ्ट निवडलं आहेस. तू वेडा आहेस”. असं निखिलने म्हटलं आहे. पृथ्विकने निखिलला दिलेले शूज अगदी लक्षवेधी आहेत. या दोघांच्या मैत्रीची आता चर्चा रंगत आहे.