Premium

चार चित्रपट करुनही काम मिळेना, शेवटी नोकरी केली पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “माझा पगार…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला करावी लागली नोकरी कारण…

Prithvik Pratap Prithvik Pratap journey
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला करावी लागली नोकरी कारण…

आजवर अनेक कलाकारांच्या कलाक्षेत्रामधील संघर्षाविषयी तुम्ही ऐकलं असेल. अगदी सामान्य कुटुंबातील आलेल्या कलाकारांनी अभिनयक्षेत्रात आपलं नशिब आजमवलं. एकाचवेळी बरेच चित्रपट करुन नंतर हाती काम नसणं हे बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत घडतं. असंच काहीसं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापच्या बाबतीतही घडलं आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे पृथ्वीक घराघरांत पोहोचला. पण इथवर पोहोचण्यासाठी त्याला अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला. ‘संपूर्ण स्वराज’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या संघर्षाविषयी भाष्य केलं आहे. पृथ्वीक म्हणाला, “२००७-२००८ पासून मी अभिनयक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. २०१३-१४च्या दरम्यान मी चार चित्रपट केले. ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘नाइट स्कुल’, ‘गांधींची सहा माकडं’ असे काही चित्रपट मी केले. त्यामधील दोन चित्रपटांमध्ये मी मुख्य भूमिका साकारली होती”.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

“अजूनही ते चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. यापुढे ते प्रदर्शित होतील असं मला वाटत नाही. इतर दोन चित्रपटांमध्ये माझ्या अगदी छोट्या भूमिका होत्या. २०१४मध्ये चार चित्रपट केले. तरीही त्यानंतर माझ्याकडे काम नव्हतं. म्हणून मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मला काम हवं होतं म्हणून मी दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडे गेलो. त्याच्यांबरोबर मी ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ चित्रपट केला होता”.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

“त्यांच्याकडे कामासाठी मी विचारणा केली. पण सध्यातरी माझ्याकडे तुझ्यासाठी काही काम नाही असं त्यांनी मला म्हटलं. तेव्हा संजय जाधव ‘तु ही रे’ चित्रपट करत होते. सानिका अभ्यंकर या माझ्या मैत्रिणीने त्यावेळी मला एक सल्ला दिला. “आता अभिनयक्षेत्रात तुझ्यासाठी काय काम नाही तर तू संजय जाधव यांच्याकडेच नोकरी कर. ड्रिमर्स नावाची पीआर व मार्केटिंग करणारी कंपनी आपण सुरु करत आहोत तर इथे तू इंटर्नशीप कर. तेव्हा माझा पगार ठरला होता फक्त ५ हजार रुपये. पहिला ५ हजार रुपये पगार मिळतात मी तो खर्च केला”. आज पृथ्वीक प्रेक्षकांचा लाडका झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fem prithvik pratap talk about his journey in film industry see details kmd

First published on: 06-06-2023 at 17:10 IST
Next Story