परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते, सारंग साठ्ये असे तगडे कलाकार मंडळी असलेला ‘नाच गं घुमा’ चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं; जे सध्या सोशल मीडियावर चांगलं ट्रेंड होतं. यावर अनेक कलाकार मंडळी, युजर्स रील करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या गाण्याची भुरळ महिला मंडळींना पडली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील महिला मंडळींनी देखील ‘नाच गं घुमा’ या गाण्यावर रील केली आहे. या रीलसाठी त्यांनी अथक प्रयत्न घेतले. त्यानंतर हास्यजत्रेच्या घुमांनी ‘नाच गं घुमा’ गाण्यावर अचूक, जबरदस्त डान्स केला. ही रील नम्रता संभेरावने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही शेअर करत नम्रताने लिहिलं आहे, “माझ्या रील आणि रिअल महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या मुली.” या रीलमध्ये नम्रतासह वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, चेतना भट्ट, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, ईशा डे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराने सुरू केलं नवं हॉटेल, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते झालं उद्घाटन

नम्रता संभेरावने शेअर केलेल्या या रीलवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वप्नील जोशी, सारंग साठ्ये, उदय टिकेकर या कलाकारांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील महिला मंडळींच्या या रीलवर प्रतिक्रिया दिली आहेत. तसेच ‘भारी’, ‘किती भारी…तुम्ही सगळ्या ना एकदम भारी आहात’, ‘सगळ्या घुमा भारीच आहेत’, ‘ये प्राजू कुठे आहे?’, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या रीलवर दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराने सुरू केलं नवं हॉटेल, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते झालं उद्घाटन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ हे गाणं अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तसंच हे गाणं परेश मोकाक्षी यांनी लिहिलं आहे. या गाण्यातील नृत्यदिग्दर्शनाची भूमिका राहुल ठोंबरेने सांभाळली आहे.