आपल्या सहज सुंदर आणि उत्स्फूर्त अभिनयाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. त्यांची भूमिका विनोदी असो अथवा गंभीर; ती प्रेक्षकांच्या मनात नेहमीच घर करते. गेली काही वर्ष ते फक्त चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत होते. पण आता मोठ्या कालावधीनंतर ते छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत.

अनेक दिवस ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेची चर्चा आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या लेखक-दिग्दर्शक जोडीच्या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता आहे. आतापर्यंत या मालिकेचे जितके प्रमुख प्रदर्शित झाले सगळ्यांमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे, दत्तू मोरे हे कलाकार दिसून आले. पण या मालिकेतील आणखीन मोठं एक सरप्राईज खरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

आणखी वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली…

म्हणजे अभिनेते मकरंद अनासपुरे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’मध्ये ते प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. दिनकर त्र्यंबक गुळस्कर असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ते पात्र पोस्ट ऑफिसच्या पार्सल विभागात गेली १७ वर्षं कार्यरत असल्याचं दाखवण्यात येणार आहे. आता आपण त्यांना अनेक चित्रपटांमध्ये पाहत आलो आहोत मात्र या मालिकेत त्यांचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर येईल.

हेही वाचा : नवी मुंबई शहराचे स्वच्छता कार्य वाखाण्याजोगे – मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भूमिकेबद्दल बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, “गेली अनेक वर्ष मी छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम केले. पण गेल्या काही वर्षात मी काल्पनिक कथा असलेल्या मालिकेत काम केलं नव्हतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार या मालिकेत आहेत. तसंच अनेक तरुण कलाकार आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा आणि विलक्षण आहे.” ५ जानेवारीपासून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.