सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एका मागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे.

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिजीतने सेजल वर्देसह लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. २४ फेब्रुवारीला कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अभिजीत व सेजल यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘सेलिब्रिटी प्रमोटर्स’ या इन्स्टाग्राम पेजवरुन अभिजीत व सेजलच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा>> “मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती, पण… ” मराठी अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, पोलिसांत केली तक्रार दाखल, म्हणाली…

अभिजीतने जून महिन्यात सेजलसह गुपचूप साखरपुडा उरकला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत त्याने चाहत्यांना माहिती दिली होती. आता अभिजीतने हळदीचे फोटो व लग्नातील काही खास क्षणांचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या फोटोंवर कमेंट करत चाहते व सेलिब्रिटींनी अभिजीत व सेजलला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> Video: “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “त्याच्या डोक्यावर केस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीत श्वेतचंद्र हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. स्टार प्रवाहवरील लक्ष्य मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्याने ‘बाजी’, ‘साजणा’, ‘बापमाणूस’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या तो ‘शुभविवाह’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिजीतप्रमाणेच सेजलही एक अभिनेत्री आहे. ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे.