भारत गणेशपूरे मराठीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. चला हवा येऊ द्या कार्यक्रमामधून ते घराघरात पोहचले. आपल्या कमाल विनोदबुद्धीने व अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. भारत गणेशपुरेंनी मालिका, चित्रपट व नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दरम्यान भारत गणेशपुरेंना म्हाडा लॉटरीतून घर मिळालं आहे. त्यांनी आपल्या या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा- “रसिकांना खरंच मायबाप का म्हणतात ते समजतंय” अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…




भारत गणेशपुरे यांनी इन्स्टाग्रामवर नुकताच त्यांचा घराचा एक व्हिडीओ पोस्ट केला. भारत गणेशपुरे यांची पत्नी अर्चना आणि मुलगा विपुल यांनी मिळून या घराची सजावट केली आहे. हॉलमध्ये आकर्षक फर्निचर आणि वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच घरात सुंदर असं देवघरही आहे. गणेपुरे यांच्या मुलाला कारची खूप आवड आहे. त्या आवडीला अनुसरुनच त्याच्या खोलीच सजावट करण्यात आली आहे. एवढचं नाही तर मुलाच्या खोलीत प्रशस्त वॉडरोबही पहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेते ती घराची नेमप्लेट. अस्सल विदर्भीय भाषेत भारत गणेशपुरेंनी आपल्या घराची नेमप्लेट बनवून घेतली आहे.
घराचं हॉलमधून निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळतं. तसेच संपूर्ण घरासाठी पांढऱ्या रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे. घराच्या कॅरिडोअरमध्ये गणेशपुरेंना चाहत्यांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच एका बाजूला गणेशपुरेंना मिळालेली पारितोषकेही ठेवण्यात आली आहेत.
भारत गणेशपुरे यांच्या या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनेकांनी भारत गणेशपुरेंच हे घर आवडलं असल्याचं सांगत कमेंट केल्या आहेत.