‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेचं नवं पर्व सुरू झालं आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या कलाकारांनी निरोप घेतला असून नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली आहे. मालिकेत ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक झळकले आहेत. एका महत्त्वाच्या भूमिकेत गिरीश ओक ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या कालच्या भागात दिसले.

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यादरम्यान शाहरुख खानने रणवीरकडे दुर्लक्ष करत दीपिका पदुकोणला मारली मिठी? व्हिडीओ झाला व्हायरल

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शिर्के कुटुंबाचा अंत होऊन कालपासून (२० नोव्हेंबर) नव्या कथेला सुरुवात झाली आहे. मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. ज्यामध्ये गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात आली आहे. आता मालिकेत जयदीपचा अधिराज तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म झाला आहे. अधिराज हा रांगड्या शेतकऱ्याच्या रुपात झळकला आहे. तर गावंढळ गौरी सुशिक्षित नित्याच्या रुपात पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या कथानकाला दमदार सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – अभिनेत्री दीपाली पानसरे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत पुन्हा एकदा खलनायिकेच्या रुपात; पहिला लूक आला समोर

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत नव्या रुपात झळकले आहेत. या मालिकेत त्यांची दमदार एन्ट्री झाली आहे. गिरीश ओक यांनी नित्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा – अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नात ‘या’ जोडीने वेधलं लक्ष, दोघांचे फोटो होतायत व्हायरल

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील ‘या’ अभिनेत्याची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत एन्ट्री; झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गिरीश ओक यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते ‘३८ कृष्ण व्हिला’, ‘काळी राणी’ या नाटकात काम करताना दिसत आहेत. रंगभूमीवर ही दोन्ही नाटक जोरदार सुरू आहेत.