‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. याच कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला विनोदवीर अभिनेता म्हणजे गौरव मोरे. तो नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून त्याला ओळखले जाते. गौरवने खडतर परिश्रम करत यशाचे शिखर गाठले आहे. गौरवच्या याच कष्टाचे आता चीज होताना दिसत आहे.

नुकतंच गौरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. गौरव मोरेला यंदाच्या वर्षीचा छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : सिद्धार्थ जाधवने दाखवली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या घरातील वस्तूंची झलक, म्हणाला “माझा भीमराया…” 

“संभाजी ब्रिगेडचा ह्यावर्षीचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२३, हा पुरस्कार मला दिल्याबदल सगळयांचे मनापासुन आभार मानतो. जय शिवराय जय शंभुराजे”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझ्या खोलीत ये आपण…” ‘तारक मेहता…’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, धक्कादायक खुलासा करत म्हणाली “मी गरोदर असताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव मोरेच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता समीर चौगुलेने या पोस्टवर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे. “अभिनंदन भावा गौरव, खूप खूप प्रेम”, असे समीर चौगुलेंनी म्हटले आहे. तर सुयश टिळकने “अभिनंदन” अशी कमेंट या पोस्टवर केली आहे.