छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीला ओळखले जाते. बिग बॉसमधून पुन्हा प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून किरण मानेंना ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने चर्चेत आहेत. नुकतंच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी किरण मानेंना सन्मानित केले. त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने हे पुन्हा फेसबुकवर सक्रीय झाले आहेत. टॉप ३ स्पर्धक ठरलेल्या किरण मानेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका सत्काराचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याबरोबर त्यांनी याबद्दल एक पोस्टही लिहिली आहे.
आणखी वाचा : ‘मी अवली लवली…’च्या एका स्किटसाठी किती वेळ लागतो? ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’च्या कलाकाराने दिले उत्तर

किरण माने पोस्ट

“…बिगबॉसमध्ये मी मनापासून खेळण्यात गुंग होतो, तेव्हा मला कणभरही कल्पना नव्हती की बाहेर माझ्या पाठीशी इतका जबराट सपोर्ट उभा रहातोय ! बाहेर आल्यापासून रोज माझे चाहते याची जाणीव करून देतात. परवा सातारकर भगिनींच्या वतीनं मंगळवार पेठेत माझा भव्य सत्कार आयोजित केला गेला. आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले. अक्षरश: भारावून गेलो. जवळपास ३००० महिला यावेळी उपस्थित होत्या. सगळ्या माझ्या बहिणी मला भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी आतूर झाल्या होत्या. नगरसेविका लिनावहिनी गोरे आणि राजूदादा गोरेंनी हा योग घडवून आणला. बाबाराजे जेव्हा म्हणाले की, “किरण माने आता फक्त सातार्‍याचे राहिले नाहीत, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके झाले आहेत.” तेव्हा सगळ्यांनी जो जल्लोष केला, तो अजूनही कानात घुमतोय !

कसे आभार मानू? काय बोलू? काही सुचत नाही. सगळ्या महाराष्ट्रातून आमंत्रणं येताहेत. लोक भेटायला उत्सुक आहेत. लै लै लै भारी वाटतंय. सगळ्यांचे मनापासून आभार”, असे किरण मानेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘मी अवली लवली…’ वरील ‘त्या’ रिलवर शिवाली परबने दिली प्रतिक्रिया, म्हणाली “विराट कोहलीने…”

दरम्यान यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक ठरले. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक होते. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.