झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. कार्यक्रमामधील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमध्ये हजेरी लावली. पण सध्या ‘चला हवा येऊ द्या’मधील एका विनोदवीराने कार्यक्रम सोडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा – Photos : १९व्या वर्षीच सुम्बुल तौकीर खानने मुंबईमध्ये खरेदी केलं आलिशान घर, नव्या घरात जंगी पार्टी, पाहा Inside Photos

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे सागर कारंडे. या कार्यक्रमात सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं. मात्र आता सागरच या कार्यक्रमामध्ये दिसत नाही. सागरची जागा अभिनेत्री श्रेया बुगडे हिने घेतली आहे.

या आठवड्याच्या भागामध्ये श्रेयाने पत्राचं वाचन केलं. श्रेयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे यादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला. पण श्रेयाने या पत्राचं वाचन करणं नेटकऱ्यांना मात्र पटलं नाही. श्रेयाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागरच्या आवाजामध्ये जी जादू आहे ती श्रेयाच्या आवाजामध्ये नाही, सागर दादा तुमची आठवण येते. सागर कारंडे यांचंच वाचन उत्तम होतं, सागर कारंडे बेस्ट अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पण या सगळ्या चर्चांवर सागरने मौन मात्र कायम राखलं आहे. अद्यापही सागरने हा कार्यक्रम सोडला असल्याची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.