अनेक जण त्यांच्या प्रेयसीचा वाढदिवस खास करण्याचा जसा प्रयत्न करत असतात, तशाच पद्धतीने आता एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. तो त्याच्या आईला मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्यांना सरप्राइज दिलं. हा अभिनेता म्हणजे सौरभ चौघुले. सौरभ ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. नुकताच त्याच्या आईचा वाढदिवस झाला. यानिमित्त त्याने आईबद्दल प्रेम व्यक्त करत एक खास पोस्ट लिहिली.

सौरभने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “काही दिवसांपूर्वीच मम्मीचा वाढदिवस झाला. दरवर्षी माझ्या वाढदिवसाला काही ना काही तरी स्पेशल करायचं, जसं शॉपिंग करून देणार किंवा एक मोबाइल घेऊन देणार. गेली दोन वर्षं कोल्हापुरात शूट करत होतो, म्हणून तिच्या वाढदिवसाला राहता नाही आलं आणि आमचा शो मुंबईत आला तेव्हा ठरवलं की मम्मीसाठी काही तरी स्पेशल करायचं, पण करणार काय, काहीच कळत नव्हतं. असाच एक प्लान केला की मम्मीला ताज हॉटेलला घेऊन जायचं. तेही तिला न सांगता – एक सरप्राइज. फोटो काढायला जातोय मरिन लाइन्सला, असं सांगून. जसं मरिन लाइन जवळ आली आणि तिच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि तिथेच ‘ताज’ हॉटेलच्या दारात जाऊन ती उघडली.”

आणखी वाचा : “मस्जिदचा मौलवी वाटतोय…”; देवदत्त नागेच्या ‘आदिपुरुष’मधील लूकवर टीका करणाऱ्याला प्रसिद्ध मराठी अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला, “काही चुकीचे…”

पुढे तो म्हणाला, “तिला कळेना की आपण कुठे आलोय, पण जेव्हा तिला सांगितलं तेव्हा काय रिॲक्ट करावं ते कळलंच नाही! आतमध्ये जाऊन फूड ऑर्डर करणं सोडून तिने सगळ्यात आधी आपल्या सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना फोन करून सांगितलं की सौरभ मला ‘ताज’ हॉटेलला घेऊन आलाय बर्थडे साठी. तिला इतकं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. ती ऑफिसला ‘ताज’जवळच होती. पण ती कधी ‘ताज’मध्ये गेली नाही. आज गेली तर आनंद तिच्या चेहऱ्यावरून झळकत होता. फोटो काढायची आवड म्हणून हॉटेलमध्ये सगळ्या ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यात फोटोज् काढले.”

हेही वाचा : कविता मेढेकरांनी उघड केलं त्यांचं फिटनेस सिक्रेट, म्हणाल्या, “याचं उत्तर एकच आहे की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी तो म्हणाला, “पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहिलंय. तिला असं आनंदी बघून मी अजून काय करू हिच्यासाठी तेच कळत नव्हतं पण एक नक्की ही सुरुवात आहे. अजून खूप काही करायचंय तुझ्यासाठी मम्मी….PS. तिला हे सरप्राइज खूप आवडलं हे घरी गेल्यावर माझ्या रूममध्ये मी कार पार्क करून येण्याआधीच AC चालू करून ठेवला होता यावरून कळलं…”