ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त देवदत्तने या चित्रपटातील त्याचं पोस्टर शेअर केलं. पण आता ही पोस्ट एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

या चित्रपटातील देवदत्त नागेच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने या चित्रपटातील त्याचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “श्रीरामाचा भक्त आणि रामकथेचा प्राण… जय पवनपुत्र श्री हनुमान.” त्याने ही पोस्ट शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी व मनोरंजनसृष्टीतील त्याच्या कलाकार मित्रमंडळींनी त्याचं कौतुक केलं. मात्र एका नेटकऱ्याने त्याच्या या लूकवर नकारात्मक कमेंट केली. पण यावर देवदत्तचा मित्र अभिनेता सौरभ चौगुलेने गोड शब्दात सडेतोड उत्तर दिलं.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’मधील हनुमानाचा लूक समोर, प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारणार भूमिका

देवदत्तच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिलं, “हा हनुमान कमी आणि मस्जिदचा मौलवी जास्त वाटतोय.” तर यावर अभिनेता सौरभ चौगुले याने उत्तर देत लिहिलं, “नको रे मित्रा!! उगीच आपलं काहीतरी नकारात्मक बोलायचं, ज्यात काही तथ्यही नाही आणि एका चांगल्या गोष्टीवरती असे काही चुकीचे मुद्दे मांडणं योग्य नाही…” पण यानंतर काही तासांतच या दोन्ही कमेंट्स डिलीट करण्यात आल्या. तसंच या पोस्टवर कमेंट करणाऱ्यांवरही निर्बंध घालण्यात आला.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘त्या’ चुका भोवणार? ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल, तक्रारकर्ता म्हणाला, “हिंदू धर्मात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र त्यात दाखवल्या गेलेल्या व्हीएफएक्समुळे प्रेक्षक नाराज झाले. या टीझरमध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर जोरदार टीका झाली आणि अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. तर या चित्रपटात अनेक बदल केल्यानंतर आता हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.