मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची कन्या पायलट होऊन परदेशी नोकरीसाठी गेली आहे. तिची करिअरमधील ही उंच भरारी शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियाद्वारे सर्वांना कौतुकाने सांगितली. तिचं कौतुक करताना पोंक्षे यांनी आरक्षणाचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच शरद पोंक्षे यांच्यावर टीका होत आहे. सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत असताना आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.

सोशल मीडियावर काही लोक पोंक्षे यांच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत, तर काही लोक अजूनही त्यांच्या विरोधात भाष्य करत आहेत. पोंक्षे यांनी जाणून-बुजून आरक्षणाचा मुद्दा उचलून वाद निर्माण केल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. नुकतंच शरद पोंक्षे यांनी एकूणच या प्रकरणावर एक मार्मिक टिप्पणी करणारी पोस्ट केली आहे.

आणखी वाचा : “कलावंत व्यक्त होत नाही म्हणून…” अभिनेते वैभव मांगले यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

आपल्या मुलीचं कौतुक करणाऱ्या पोस्टवरुन जातीपातीचं राजकारण करून ट्रोल करणाऱ्या लोकांना शरद पोंक्षे यांनी उत्तर दिलं आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शरद पोंक्षे लिहितात, “आपण संध्या देवघरात छान दिवा लावतो,तो फक्त देवासमोर प्रकाश पाडावा, घरात प्रसन्न वाटाव म्हणुन. पण त्याची वात उंदीर घेऊन पळतो व सर्व घराला आग लावतो, तस झाल.आग वातीन नाही लावली तर ती उंदरानं लावली.नाही तर वातीचा मंद प्रकाश फक्त देवघरा पुरताच मर्यादित राहिला असता पण उंदरानं ती वात घरभर फिरवून संपूर्ण घराला आग लावली तसं काहीतरी चालू आहे आता दोष मंद तेवणाऱ्या वातीचा? की वात गावभर फिरवून आग लावणाऱ्या उंदराचा?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पोंक्षे यांच्या या पोस्टखाली लोकांनी कॉमेंट करत त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. “कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता चौथीपासून तिने पाहीलेलं स्वप्न पूर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तुझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.” मुलीची गगनभरारी कोणत्याही पित्यासाठी आनंदाचा क्षण असतो. तो आनंदाचा क्षण लोकांसोबत साजरा करताना शरद पोंक्षे यांनी ही वरील पोस्ट लिहिली होती.