अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघे नेहमीच चर्चेत असतात. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून ते घराघरात पोहचले. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. एप्रिल २०१९ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाअगोदर ते काही काळ लिव्ह इनमध्ये राहत होते. नुकत्याच एका मुलाखतीत सखी आणि सुव्रतने लिव्ह इन मध्ये राहतानाचा अनुभव सांगितला आहे. हेही वाचा- शिवानी रांगोळेच्या ऑनस्क्रीन लग्नाबाबत विराजस कुलकर्णीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला… "एखादी वस्तू विकत घेताना आपण ती पारखून बघतो चांगली आहे का नाही. लग्न हा खूप मोठा निर्णय आहे. एकत्र राहिल्याशिवाय तो कसा करायचा. तुमचं एखाद्यावर प्रेम असतं पण तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर सहवास नाही घडवता येत. बरेचदा एकत्र राहण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं. तुम्हाला सहवास गरजेचा आहे. आणि त्या सहवासादरम्यान आपल्या अनेक सवयी बदलाव्या लागतात. आनंदाने बदलाव्या लागतात. म्हणून लिव्ह इनमध्ये राहून पाहणं आवश्यक असतं." 'दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या सेटवर सखी आणि सुव्रतची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर त्यांनी त्यांनी अमर फोटो स्टुडिओ नावाच्या नाटकात एकत्र काम केलं. हळूहळू त्यांच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि ११ एप्रिल २०१९ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लॉकडाउनदरम्यान सखी आणि सुव्रत ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत एकत्र झळकले होते.