गेल्या काही महिन्यांपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नव्या मालिकांचं सत्र सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला अवघ्या तीन, पाच आणि सहा महिन्यात या नव्या मालिका प्रेक्षकांना निरोप घेत आहेत. टीआरपी अभावी अचानक नव्या मालिका बंद केल्या जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘अबीर गुलाल’.

२७ मेपासून सुरू झालेली ‘अबीर गुलाल’ मालिका अवघ्या सहा महिन्यात ऑफ एअर होणार आहे. या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण, आता अचानक बंद केली जाणार आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी कलाकार मंडळींना कळालं. याविषयी अक्षय केळकर काय म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनानंतर ‘टाइम गॉड’ झाली मराठी अभिनेत्री? आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

नुकताच अक्षय केळकरने ‘कलाकृती मीडिया’शी संवाद साधला. यावेळी त्याला मालिकेच्या चित्रीकरणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, “मालिकेचं चित्रीकरण कमाल सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मालिका बंद होतेय कळालं. पण काम करताना एनर्जी तिच आहे. उरलेले काही दिवस आपल्याला कमाल घालवायचे आहेत. सहा वर्ष मालिका चालली असं मनातल्या मनात म्हणायचं आहे.”

त्यानंतर अक्षय केळकरला मालिकासंपल्यानंतरच्या प्लॅनविषयी विचारलं. तेव्हा अक्षय म्हणाला, “आम्हाचा दोन दिवसांपूर्वी मालिका संपतेय कळालं. त्यामुळे दोन दिवसांत काय प्लॅन होणार. माझ्याकडे दोन स्क्रिप्ट पडून आहेत आणि तीन लाइन अप आहेत, असं काही नसतं.”

हेही वाचा – Bigg Boss 18: टास्कदरम्यान अविनाश मिश्राचा संयम सुटला, जोरात धक्का मारून दिग्विजय राठीला किचनमध्ये पाडलं, व्हिडीओ होतोय व्हायरल

तुला मालिका बंद होणार कळल्यावर धक्का बसला का? त्यावर अक्षय म्हणाला, हो. प्रश्नच नाही. पण, प्रत्येकाच्या बाजू आहेत. ती माणसं त्यांच्या त्यांच्या जागी योग्य असतात. हे आपण खूप समजूदार झाल्यानंतर कळतं. पहिल्या वेळी खूप वाईट वाटतं. पण आता मला तितकं वाईट वाटतं नाहीये. पण एक गोष्ट आहे, मला पुन्हा स्ट्रगल करावं लागेल. जे प्रत्येकाच्या वाटाल्या येतं. तुमच्या माध्यमातून सांगतो मी सध्या फ्री आहे.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘अबीर गुलाल’ मालिकेआधी ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी त्याने पेलली होती. तसंच अक्षयने हिंदी मालिकेतही काम केलं. शिवाय तो ‘दोन कटिंग’ या वेब फिल्ममध्ये समृद्धी केळकरबरोबर पाहायला मिळाला होता.