Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८ पर्वात नुकताच टाइम गॉडसाठी टास्क पार पडला. हा टास्क जोड्यांमध्ये खेळला गेला. जी जोडी शेवटपर्यंत टिकणार ती जोडी टाइम गॉड होण्यासाठी निवडली जाणार होती. यावेळी चाहत पांडे आणि कशिश कपूरला कोणीही जोडीदार मिळाला नव्हता. त्यामुळे टाइम गॉडच्या टास्कच्या संचालनाची जबाबदारी चाहत आणि कशिशला देण्यात आली. त्यांनी रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकर यांच्या जोडीला विजयी घोषित केलं. त्यामुळे सुरू असलेल्या सहाव्या आठवड्यात रजत आणि शिल्पा या दोघांपैकी एकजण टाइम गॉड होणार असल्याचं निश्चित झालं आहे. आता विवियन डिसेनानंतर कोण टाइम गॉड होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच ‘बिग बॉस १८’चा एक प्रोमो खूप व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये टास्कदरम्यान घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस तक’ या एक्स अकाउंटवर ‘बिग बॉस १८’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला बंटी आणि बबली म्हणजेच विवियन आणि चाहत पांडेमधील नोकझोक पाहायला मिळत आहे. विवियनला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी चाहत करताना दिसत आहे. विवियनला कधी स्पर्श करतेय तर कधी त्याच्या कॉफीला किंवा कपला हात लावताना चाहत दिसत आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”

त्यानंतर एका टास्कदरम्यान दिग्विजय राठी आणि अविनाश मिश्रामध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. दिग्विजय अविनाशला म्हणतो की, तुझ्या डोळ्यात जी भीती दिसतेना ते पाहून मला मजा येते. यावेळी दिग्विजय आणि अविनाश दोघं एकमेकांना धक्का मारताना दिसत आहेत. तेव्हा दिग्विजय अविनाशना हाताचा वापर करून धक्का मारतो आणि याचवेळी अविनाशचा संयम सुटतो. दोघांमध्ये फुल्ल राडा होतो. यावेळी घरातील इतर सदस्य दोघांची भांडणं सोडवण्यासाठी येतात. पण, तरीही भांडण काही थांबायचं नाव घेत नाही. त्यानंतर दिग्विजय पळताना दिसत आहे. तेव्हा अविनाश त्याच्या मागे पळतो आणि जोरात धक्का देतो. त्यामुळे दिग्विजय किचनमध्ये पडतो. यानंतर आता काय घडतं? हे येत्या भागात पाहायला मिळेल.

हेही वाचा – Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Bigg Boss 18: सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया ‘अशी’ पार पडली, घराबाहेर जाण्यासाठी सात सदस्य झाले नॉमिनेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर, रजत दलाल, दिग्विजय राठी, तजिंदर सिंह बग्गा हे सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे सहाव्या आठवड्यात या सात सदस्यांमध्ये कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.