मराठी मनोरंजन सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशीला ओळखले जाते. स्वप्निल जोशी सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला. झी वाहिनीवरील या मालिकेत स्वप्नील व शिल्पा मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत इतर कलाकारदेखील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. या मालिकेतील अभिनेत्री अभिज्ञा भावेसाठी स्वप्नील जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिज्ञा भावे सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये ती साकारत असलेलं वल्ली हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे. तिची ही नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे त्या निमिताने स्वप्नील जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तो असं म्हणाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिज्ञा! तू सरळ, सोपी मजेदार आणि प्रेमळ अशा प्रकराची आहेस. या वर्षी तुझी स्वप्न पूर्ण होवोत. हसत राहा. हसत राहा. आणि आमचे जीवन चांगले बनवत राहा, तुझ्याशिवाय हे करू शकत नाही! माझं तुझ्यावर प्रेम आहे. अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

मालिका संपताच अभिज्ञा भावेचा व्हेकेशन मोड ऑन, कुटुंबियांबरोबर अबू धाबीला घेतेय सुट्ट्यांचा आनंद

अभिज्ञाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंस केलं. तसेच कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान तिने निर्माण केलं. पण अभिज्ञा याआधी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. याबाबत तिने स्वतःच खुलासा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तू तेव्हा तशी’मधील अनामिका व सौरभ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. परंतु, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिज्ञा भावे, सुहास जोशी, रुमाणी खरे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित व्हायची. आता या मालिकेच्या जागी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही नवी मालिका सुरू होणार आहे.