मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अक्षया देवधर व हार्दिक जोशीने २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. पुण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर हार्दिक-अक्षयाने नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले.

अक्षयाने लग्नानंतर पहिल्यांदाच नववधूच्या साजश्रृंगारातील व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. लाल रंगाची साडी नेसून त्यावर पिवळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज अक्षयाने परिधान केला आहे. हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू व नाकात नथ असा श्रृगांर अक्षयाने केलेला दिसत आहे. या व्हिडीओला तिने जरीच्या साडीत हे गाणंही दिलं आहे.

हेही वाचा>>‘दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींची कमाई केल्यानंतर अजय देवगण भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला…

हेही वाचा>>‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची आयुष्मान खुरानासाठी खास पोस्ट, म्हणाली…

अक्षयाच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पती हार्दिक जोशीला टॅग करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा>> “आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही आनंदी आहेत. अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.