मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात ती रनरअप ठरली होती. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. अपूर्वा नेमळेकरचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच तिने लालबाग मुंबईचा राजा सार्वजनिक गणेश गल्ली मंडळाच्या गणपतीचे पाद्यपूजन सोहळ्याला हजेरी लावली.

अपूर्वा नेमळेकरने नुकतंच याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत ती मुंबईचा राजा असलेल्या गणेशगल्लीच्या मंडळाला भेट देताना दिसत आहे. मुंबईचा राजा असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या गणपतीचा पाद्यपुजन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिने छान कांजीवरम साडी नेसून या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.
आणखी वाचा : “ऐनवेळी शासनाच्या कार्यक्रमामुळे नाटकाचे प्रयोग रद्द होतात”, प्रसिद्ध मराठी अभिनेता स्पष्टच बोलला, म्हणाला “त्यांच्यासाठी…”

“लालबाग मुंबईचा राजा सार्वजनिक गणेश गल्ली मंडळाच्या गणपतीचे वर्ष ९६ चें पाध्यपूजन सोहळा गुरुपौर्णिमाच्या दिवशी गणेश गल्ली मैदानात आयोजित करण्यात आला होता. योगायोगाने हा सोहळा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आला.आणि आपण मंडळाने या सोहळ्यानिमित्त मला उपस्थित राहण्याचें निमंत्रण दिले.. धन्यवाद.

या निमित्ताने आज लालबाग च्या राज्याच्या पाध्यपूजनाचा दर्शन घेण्याचे भाग्य मला मिळाले. त्याबद्दल मी मंडळाचे मनःपूर्वक आभार मानते, गणपती बाप्पा मोरया!!”, असे कॅप्शन अपूर्वाने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याबरोबरच अपूर्वाने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिथे उपस्थित असेलल्या व्यक्तींबरोबर जल्लोष साजरा करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.