गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रिल स्टार आणि इन्फ्लुएन्सरची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या रिल स्टारला अनेक सर्वसामान्य लोकही प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत. यामुळेच अनेक सोशल मीडिया रिल स्टार हे घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. मात्र आता याच सोशल मीडियावर रिल स्टार आणि इन्फ्लुएन्सरवर अनेक कलाकार संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते. भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने कान्स महोत्सवाबद्दल एक बातमी शेअर केली आहे. कान्स महोत्सवात इन्फ्लुएन्सर कशासाठी? असा आशय असलेली बातमी भाग्यश्रीने पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “स्वत:च्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी…” अभिज्ञा भावेचे रिल स्टार, इन्फ्लुएन्सरला खुलं पत्र, म्हणाली “दुर्दैवाने माझ्या इंडस्ट्रीत…”

याबरोबर तिने रिल स्टार आणि इन्फ्लुएन्सरवर संतापही व्यक्त करत त्यांना जाब विचारला आहे. “मी कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या विरोधात नाही. पण चित्रपट किंवा सिनेसृष्टीचे एखाद्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी फक्त लोकप्रिय चेहरा असण्याची गरज आहे का?” असा सवाल भाग्यश्री मोटेने उपस्थित केला आहे.

bhagyashree mote
भाग्यश्री मोटेची पोस्ट

दरम्यान भाग्यश्री मोटेच्या आधी अभिज्ञा भावेने याबद्दल संताप व्यक्त केला होता. “मी कधीही कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या विरोधात नव्हते. ते कर्तृत्ववान आहेत, याबद्दल मला शंका नाही. पण जेव्हा ज्यांनी वर्षानुवर्षे यात काम केलंय, मेहनत केलीय अशा व्यक्तींऐवजी लोकप्रिय लोकांना प्राधान्य दिले जाते, तेव्हा मला ही एक समस्या असल्याचे जाणवते”, असे तिने यावेळी म्हटले होते.

आणखी वाचा : “स्पष्ट पुरावे मिळूनही कारवाई नाही”, बहिणीच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली “तिच्या चेहऱ्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जेव्हा एखाद्या विशिष्ट कलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांऐवजी लोकप्रिय चेहरे दिसतात, कारण फक्त ते लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे जे लोक त्यात मेहनत करतात त्यांना संधी मिळत नाही. एखाद्या ठिकाणचे प्रतिनिधीत्व करणे हे वेगळे असते आणि स्वत:च्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी इंटरनेटचा वापर करुन घेणे, ज्याचा तुम्हाला फायदा होईल, या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या असतात”, असेही ती म्हणाली होती.