‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली. कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नगाठ बांधून तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून एका फोटोमुळे गौतमीचं स्वानंदबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक ठिकाणी तिला याबाबत विचारण्यात आलं. पण तिने याबाबत मौन पाळलं. अखेर २३, डिसेंबरला गौतमीने थेट मेहंदी समारंभाचा फोटो शेअर करून प्रेम जाहीर केलं. त्यानंतर हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक तिचा लग्नसोहळा पाहायला मिळाला. मोठ्या थाटामाटात गौतमी-स्वानंदचा लग्नसोहळा झाला. पण लग्नानंतर गौतमीची झालेली अवस्था तिने स्वतः चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे २५ डिसेंबरला स्वानंदबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाला अनेक कलाकार मंडळीनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. अशातच गौतमीने लग्नानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची लग्नानंतरची अवस्था पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: डेटवर जाण्यासाठी नकार, पण नंतर…; गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरची फिल्मी लव्हस्टोरी

गौतमीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नानंतरची अवस्था शेअर केली आहे. ज्यामध्ये ती विक्ट्रीच साइन करताना दिसत आहे. तसेच तिच्या डोळ्याखाली अन्डर आय पॅचेस लावलेलं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत गौतमीने लिहिलं आहे, “लग्नानंतरचा परिणाम.”

हेही वाचा – मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ठरली नंबर १, जाणून घ्या टॉप १० मालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सारे तुझ्याचसाठी’ ही तिची पहिली मालिका होती. हर्षद अतकरीबरोबर या मालिकेत ती झळकली होती. त्यानंतर ती ‘माझी होशील ना’ मालिकेत पाहायला मिळाली. गौतमीची ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची आणि विराजस कुलकर्णीची जोडी तर चांगलीच हीट झाली. सध्या गौतमी आणि विराजस ‘गालिब’ या नाटकात एकत्र काम करताना पाहायला मिळत आहेत.