मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत हेमांगीने काम केलं. काही दिवसांपूर्वी हेमांगी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर आता हेमांगीची एका लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. तिने स्वत: याबद्दलची माहिती दिली.

हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत हेमांगी ही अभिनेत्री सृष्टी झा बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे या हिंदी मालिकेचे नाव आहे.
आणखी वाचा : कुशल बद्रिकेने दिले ‘पांडू २’ चित्रपटाचे संकेत, विजू माने म्हणाले “आता तू म्हणतोस तर…”

भेटा चिटणीस कुटुंबाला…कैसे मुझे तुम मिल गए मध्ये २७ नोव्हेंबरपासून रात्री १० वाजता, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. हेमांगीची ही मालिका २७ नोव्हेंबरपासून रात्री १० वाजता झी टीव्हीवर पाहता येणार आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आता हेमांगी कवी ही कैसे मुझे तुम मिल गए या मालिकेत झळकणार आहे. ही मालिका येत्या २७ नोव्हेंबरपासून झी टीव्ही वाहिनीवर रात्री १० वाजता प्रक्षेपित होणार आहे. यात ती सृष्टी झा च्या आईचे पात्र साकारत आहे.

आणखी वाचा : Video : ट्रॅफिकमध्ये अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, वेळ घालवण्यासाठी गाडीत केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हेमांगी कवीने याआधी अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. हेमांगी ‘अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली. त्याबरोबरच ती अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ताली वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली.