कविता लाड – मेढेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘चार दिवस सासूचे’ मालिकेमुळे त्या घराघऱात पोहचल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या सूनेच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक झालं होतं. कविता मेढेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत त्या चाहत्यांना आपडेट देत असतात. नवरात्रीनिमित्त कविता मेढेकर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअऱ केला आहे.

हेही वाचा- “पैशासाठी काहीही नका दाखवू”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले, ‘त्या’ सीनमुळे मालिकेला केलं ट्रोल

कविता लाड आणि प्रशांत दांमले यांच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटक नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे नाटक सर्वत्र हाउसफुल सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच कविता लाड या नाटकाच्या प्रयोगासाठी ३ आठवड्याच्या परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. आता त्या या दौऱ्यावरुन परतल्या आहेत. त्यानिमित्त कविता लाड यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअऱ केली आहे.

हेही वाचा- ‘ही’ आघाडीची मराठी अभिनेत्री आहे निखिल बनेची मोठी चाहती; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर जाऊन अभिनेत्याला म्हणाली…

कविता मेढेकर यांनी आपला एक पाठमोरा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे “३ आठवड्यांचा झंझावती आणि यशस्वी अमेरीकेचा नाटकाचा दौरा करून आता मायदेशी परतण्याचे वेध लागलेत.Last Minute मुलांच shopping झालं,Bags भरून झाल्या..आता घर,आपली माणसं, सण असं सगळं साजरं करायचयं…भुवनेश्वरीच्या पात्रात विविध रंग भरायचेत! BTW आजचा नवरात्रीचा रंग पांढरा आहे आणि मी शुभ्र पांढऱ्या ढगांसोबत आजचा पांढरा रंग साजरा करतीये”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कविता मेढेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट, नाटक मालिकेच्या माध्यमातून त्यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत ‘भुवनेश्वरी’ पात्र साकारत आहेत. या पात्राला प्रेक्षकांकडून मोठी पसंत मिळत आहे.