मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (३ डिसेंबर) लागला. मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या तीन राज्यात भाजपाचं कमळ फुललं. त्यामुळे सध्या या निकालावर विविध प्रतिक्रिया येत आहे. मराठी सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने या निकालावर सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे. नुकतीच मेघाने तीन राज्यातील भाजपाच्या विजयावर पोस्ट केली आहे. तिने एक फोटो शेअर करत लिहिलं, “भारतीय जनता पार्टी झिंदाबाद….जय श्रीराम…तिन्ही राज्यातल्या जनतेचे मनापासून अभिनंदन…तिन्ही राज्यातल्या कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन… तेलंगणा राज्यातही भाजपाचा प्रवेश झाला…तेथील जोमाने काम करणार्‍या पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन…”

हेही वाचा – जुई गडकरी-अमित भानुशालीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला टक्कर द्यायला येणार आता…

पुढे मेघाने लिहिलं, “सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्‍या पक्षांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली…सहकाऱ्यांनो आपणही अशीच मेहनत घेऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये मिळणार्‍या यशात, सांस्कृतिक प्रकोष्ठ म्हणून खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलू…जय हिंद..”

हेही वाचा – शिवानी सुर्वेला दोन-तीन दिवसांतच ‘या’ लोकप्रिय हिंदी मालिकेतून टाकलं होतं काढून, अभिनेत्री स्वतः किस्सा सांगत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याच वर्षी जून महिन्यात अभिनेत्री मेघा धाडेने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिने भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.