Mrinal Kulkarni And Virajas Kulkarni : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मृणाल कुलकर्णी यांचा लाडका लेक विराजसने देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ मालिकेत त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. आता विराजस एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

विराजसने यापूर्वी अनेक प्रायोगिक नाटकांचा दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. तसेच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘गालिब’ नाटकात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. आता विराजस एका नव्या भूमिकेतून म्हणजेच लेखक व दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे अभिनेत्याचं पहिलं व्यावसायिक नाटक असल्याचं मृणाल कुलकर्णी ( mrinal kulkarni ) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : Video : ‘एक दो तीन…’, ३६ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! अमेरिकेतील व्हिडीओ व्हायरल

मृणाल कुलकर्णी यांची विराजससाठी खास पोस्ट

विराजसने ‘वरवरचे वधू – वर : बिन प्रेमाची love story!’ या नाटकाचं लेखन अन् दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये सखी गोखले व सुव्रत जोशी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या लाडक्या लेकासाठी खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

“आपल्या विराजसचं लेखक – दिग्दर्शक म्हणून पहिलं व्यावसायिक नाटक! १५ ऑग्टपासून रंगभूमीवर दाखल! सुव्रत, सखी, सुरज खूप प्रेम आणि शुभेच्छा… विराजस खूप खूप आनंद आणि अभिमान!” अशी पोस्ट शेअर करत मृणाल कुलकर्णी ( mrinal kulkarni ) यांनी विराजसला शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Video : बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे फोन रितेश देशमुख आणि अक्षय कुमार यांच्या हातात! भाऊच्या धक्क्यावर आज स्पर्धकांची गुपितं बाहेर पडणार का?

mrinal kulkarni
मृणाल कुलकर्णी यांची विराजससाठी खास पोस्ट ( mrinal kulkarni )

हेही वाचा : न हसता व्हिडीओ बघा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं चॅलेंज; नेटकरी म्हणाले, “तुम्ही सगळे एकत्र…”

View this post on Instagram

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विराजसच्या ‘वरवरचे वधू – वर’ या नाटकातून सखी गोखले व सुव्रत जोशी ही खऱ्या आयुष्यातील जोडी प्रेक्षकांना रंगभूमीवर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. यापूर्वी सखी-सुव्रतने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या गाजलेल्या नाटकात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे सर्वांच्या मनात सध्या या नाटकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.