छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून प्रिया मराठेला ओळखले जाते. तिने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रियाने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या प्रिया ही सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच तिने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रियाने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती आणि तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघे दिसत आहे. यात ते दोघेही दिल्लीतील कुतूब मिनारची सफर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; या कारणामुळे खालावली प्रकृती, डॉक्टरांचे उपचार सुरू
“कुतूब मिनार… आम्हाला फिरायला खूप आवडते. सुट्टीच्या दिवशी आम्ही फिरायला गेलो तर दिवसभर हॉटेलमध्ये कधीच थांबत नाही. आम्ही बॅग भरतो आणि ते संपूर्ण शहर फिरतो. दिल्लीतील पहिला दिवस आणि पहिले ठिकाण भव्य प्राचीन वास्तू- कुतुबमिनार.. भारताच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देणारा..”, असे कॅप्शन प्रियाने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूर झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली…
दरम्यान प्रिया मराठे ही ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकत होती. मात्र काही महिन्यांपूर्वी तिने या मालिकेला रामराम केला. तिने या मालिकेत मोनिका हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र सध्या या मालिकेतील मोनिका हे पात्र तेजस्विनी लोणारी साकारत आहे.