Shivani Sonar and Ambar Ganpule Engagement: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांचा साखरपुडा, लग्न झालं. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान झाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सिंधुताई माझी माई’मधील अभिनेत्री शिवानी सोनारने गुपचूप साखरपुडा उरकला. ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकेतील झळकलेला अभिनेता अंबर गणपुले याच्याशी शिवानीचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांचा सुखद धक्का बसला. अशातच आज शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

‘द रील फार्म’ या इन्स्टाग्राम पेजवर शिवानी सोनार व अंबर गणपुलेच्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, दोघांचं फोटोशूट, डान्स, केक कटिंग, अंगठी घालणे हे सर्व काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या शेवटची शिवानी व अंबरच्या कुटुंबाचा छान फोटो आहे.

a young boy click family photo with statues at cloth shop
VIDEO : “आजन्म सिंगल!” चक्क दुकानासमोर लावलेल्या पुतळ्यांबरोबर काढला परफेक्ट फॅमिली फोटो, व्हिडीओ व्हायरल
Viral Video A dog challenged a tiger
नाद करायचा नाय! निवांत बसलेल्या वाघाला कुत्र्याने दिली खुन्नस; पुढच्या काही सेकंदात झालं असं काही… VIDEO पाहून उडेल थरकाप
Tried to bite the person who came to catch the python
बापरे, अजगराची सटकली! पकडायला आलेल्या सर्पमित्राला डसण्याचा प्रयत्न; पुढे जे घडलं ते खूप भयानक, पाहा VIDEO
heart touching video mother dog buried her dead child herself people got emotional after watching video viral
काय वेदना झाल्या असतील ‘त्या’ आईच्या काळजाला! पोटच्या मृत पिल्लाला मातीत पुरलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
A farmer's son grand entry into the wedding
बैलगाड्याचा नाद! शेतकऱ्याच्या मुलाने लग्नात घेतली जबरदस्त एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Monkey kidnaps a puppy viral video
माकडाने केले कुत्र्याच्या पिल्लाला किडनॅप; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हा कुठल्या जन्मातला बदला”
monkey Attack on child
चिमुकल्यावर माकडाचा हल्ला! खांद्यावर चढून थेट….पाहा थरारक Viral Video

हेही वाचा – Video: डोळ्यात काजल, कपाळावर काळा टिळा, आमिर खान लेक जुनैद खान दिसला वेगळ्याच रुपात; म्हणाला, “भाई लोक…”

साखरपुड्यात शिवानी व अंबरने दोन लूक केले होते. विधीसाठी शिवानीने शेवाळी रंगाची साडी नेसली होती. तर अंबरने पांढऱ्या कुर्त्यावर शिवानीला मॅचिंग करण्यासाठी शेवाळी रंगाच जॅकेट परिधान केलं होतं. तसंच त्यानंतर अंगठी घालण्याच्या कार्यक्रमासाठी दोघं वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाले. शिवानी पांढऱ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात दिसली. तर अंबरने निळ्या रंगाची नवाबी परिधान केली होती. साखरपुड्यात शिवानी व अंबर खूपच सुंदर दिसत होते.

हेही वाचा – अदा शर्माच्या आवाजात स्वतःने गायलेलं भक्तीगीत ऐकून भारावला प्रथमेश लघाटे, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे. आता दोघं कधी लग्नबंधनात अडकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.