मराठी सिनेसृष्टीतील स्टार किड्सप्रमाणे सख्ख्या बहिणींच्या जोड्याही प्रसिद्ध आहेत. मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे, भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते, समिधा गुरू आणि मृणाल देशपांडे, खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे या बहिणींच्या जोड्या सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. नुकतंच अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिच्या बहिणीसाठी एक खास पोस्ट केली आहे.

खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे या दोघीही सध्या झी मराठीवरील मालिकांमध्ये झळकताना दिसत आहे. खुशबू ही सध्या झी मराठीवरील ‘सारे काही तिच्याचसाठी’ या मालिकेत काम करत आहे. तर तितिक्षा ही झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे. नुकतंच त्या दोघींनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तितिक्षाने तिची बहिण खुशबूसाठी एक खास पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”

तितिक्षा तावडेने केलेली कविता

“ताई, आज विचारावसं वाटलं, तुझ्यासोबत सहज जरा बोलावसं वाटलं,

ताई, अगं इतकं परफेक्ट कोण असतं, तुझ्याशिवाय जगात दुसरं कोणीच करेक्ट नसतं,

कसं जमतं तुला हट्ट न करणं, माझ्यासाठी नेहमी तुझ्या स्वप्नांचा त्याग करणं,

लहानपणी भांडणात नेहमी मीच रुसायचे, राग खूप यायचा तुझा, पण शेवटी तुझ्याच कुशीत येऊन झोपायचे,

ताई रडताना मला नेहमी एक आश्चर्य वाटायचं, माझ्या डोळ्यातलं पाणी तुझ्या डोळ्यात कसं असायचं,

विचार करुन करुन मी खूप थकायचे, माझे सगळे सिक्रेट तुला कसे कळायचे,

तू मात्र अशी गालातच हसायची, ‘अशी कशी आमची वेडाबाई’ असं म्हणतं शब्दांच्या भावना थेट मिठीतूनच सांगायचीस,

अथांग समुद्रासारखं कायम माझ्यावर प्रेम करत राहिलीस, माझा अंधार दूर व्हावा, म्हणून वातीसारखी स्वत: जळत राहिलीस,

तू सोबत असताना सुखाला कधीच कमी कशी गं नसते, मनाला विचारलं तर मनाने सांगितलं, अगं वेडे मोठी बहिण खरंतर आईच असते, मोठी बहिण खरंतर आईच असते.”

तितिक्षाने केलेल्या या कवितेचा एक व्हिडीओ ‘झी मराठी’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तितिक्षा ही कविता ऐकवताना दिसत आहे. तर खुशबू तावडे ही भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया, म्हणाले… 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे ही बहिणींची जोडी मराठी टेलिव्हिजनवर चांगलीच प्रसिद्ध आहे. त्या दोघींचं एकमेकींवर नितांत प्रेम आहे. त्या दोघीही एकमेकींच्या सख्खा बहिणी असल्या तरीही त्या कायमच मैत्रिणीसारख्या राहतात. खुशबू ही तितिक्षाला गुड्डू किंवा गुड्डा म्हणते. तर तितिक्षा मोठ्या बहिणीला खुशबूला सोना या नावानं हाक मारते. त्या दोघींनीही मालिकाविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.