मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे-कानिटकर ही कायमच चर्चेत असते. गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारेला ओळखले जाते. सध्या उर्मिला ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे. नुकतंच या मालिकेतील शूटींगदरम्यानचा एक व्हिडीओ उर्मिलाने पोस्ट केला आहे.

उर्मिलाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने “हा अन्याय आहे की नाही? कमेंटमध्ये सांगा. स्टार प्रवाह वाहिनीवर तुझेच मी गीत गात आहे पाहायला विसरु नका”, असे उर्मिलाने म्हटले आहे.
आणखी वाचा : एका अक्षरामुळे उर्मिला कोठारे आर्थिक फसवणुकीपासून वाचली, जाणून घ्या काय घडलं?

उर्मिलाने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचे शूटींग करताना दिसत आहे. या व्हिडीओत ती तळपत्या उन्हात शूट करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला उर्मिला म्हणते की, “हा आहे तळपता सूर्य. ज्याच्याखाली आम्ही शूटींग करतो, एप्रिल महिन्यात आऊटडोअरमध्ये शूटींग करायला आलेली मंजुळा. साधारण अॅक्शन आणि कटच्या नंतर मी अशी दिसते.”

त्यानंतर तिने दिग्दर्शक हे कसे बसलेले असतात, याबद्दल व्हिडीओत सांगितले. “आमचे दिग्दर्शक हे आम्हाला उन्हात शूटींग करायला लावून स्वत: मात्र छपराखाली बसले आहेत. त्याबरोबर पंखाही लावला आहे. तर हा अन्याय आहे की नाही”, असे उर्मिला या व्हिडीओत बोलत आहे.

आणखी वाचा : उर्मिला कोठारे लवकरच घेणार समीर वानखेडेंची भेट, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्मिलाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. “ताई ऊन किंवा पाऊस किंवा थंडी कष्ट केले, तरच पैसा दिसतो त्याच्यासाठी कुठलाही मतभेद नसावा आम्ही सुद्धा उन्हात काम करतो”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एकाने “कोठाऱ्यांच्या सुनेला उन्हात काम करायला लावतायत म्हणजे हा खूप मोठा अन्याय आहे डायरेक्टर ला मिरचीची धुनी देऊ या का”, असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने “किती सनस्क्रीन लावली आहात”, असेही तिला कमेंट करत विचारले आहे.