मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदार हे नाव कायमच चर्चेत असते. त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. आतापर्यंत अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्या घराघरात पोहोचल्या. नुकतंच त्यांच्या एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

विशाखा सुभेदार या इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी एक रिल शेअर केले आहे. यात त्या एका गाण्याच्या लिरिक्स गुणगुणताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट केली आहे.
आणखी वाचा : “माझा आगाऊपणा…”, सोहम बांदेकरने आईला दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “आम्हाला तुझे फोटो…”

“मला कॉलेजमध्ये असताना एक मुलगी खूप आवडायची. त्यावेळी ती बारावीत होती आणि मी १४ वीत होतो. तिचे नाव विशाखा होते. मी जेव्हा तुमच्या अशा काही पोस्ट पाहतो, तेव्हा मला माझे जुने दिवस आणि आठवणी आठवतात. या विशाखा नावाच्या मुली डोळ्यांनी खेळतात, ती पण खेळायची!”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

vishakha subhedar comment
विशाखा सुभेदार

त्यावर विशाखा सुभेदारने हसण्याचे इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “मी खेळत नसते”, अशी कमेंट विशाखा सुभेदार यांनी केली आहे. त्यावर त्या चाहत्याने “विशाखा सुभेदार काहीपण, तुझा बरसे ए क्यू अँखीया वाला विडिओ पहा , य बाबा एकदम खतरणाक ! तू typical herione आहे ! आणि जाम फेवरेट आहे, तशी नम्रता संभेराव फेवरेट आहे पण तुझं नाव विशाखा आहे म्हणून तू पहिली”, असे त्याने म्हटले आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विशाखा सुभेदार यांना विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाते. तिने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्या घराघरात पोहोचल्या. गेल्या काही दिवसांपासून त्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकात व्यस्त आहे. तसेच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे.