‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. तेजस्विनीच्या एक्झिटने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आजच्या भागात एक नव्हे तर चक्क दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. ‘बिग बॉस’च्या या निर्णयामुळे स्पर्धकदेखील आश्चर्यचकित झाले.

आजच्या भागाची सुरवात ‘भ्रमाचा भोपळा’ या खेळाने झाली. यात वाईल्ड कार्डद्वारे एंट्री घेतलेल्या स्पर्धकांनी इतर स्पर्धकांच्या बाबतीत आपले मत मांडून त्यांच्या डोक्यावर भ्रमाचा भोपळा फोडला. जेव्हा घरातून बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा महेश मांजरेकरांनी विशाल निकाल, मीरा जगन्नाथ यांची नाव घेतली. याचं कारण महेश मांजरेकरांनी सांगितलं की, हे दोन खेळाडूं फक्त एकाच आठवड्यासाठी आले होते. हे दोनी स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्रीमधून घरात आले होते.

ज्या हॉटेलमध्ये मी एक रात्र राहिले त्याचे कर्मचारीच…” तेजस्विनी लोणारीने सांगितला ‘तो’ अनुभव

विशाल निकम, मीराने घर सोडताना इतर स्पर्धकांना इतर शुभेच्छा देत होते. तसेच त्यांच्या अचानक एक्झिटमुळे सहाजिकच इतर स्पर्धक नाराज झाले. हे दोन स्पर्धक सर्वात जास्त चॅलेंजिंग आहेत असे इतर स्पर्धकांचे मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: राखी सावंतचा पदर पकडला, तिच्या मागे धावले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्डद्वारे चार सदस्यांनी एन्ट्री घेतली होती. राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जगन्नाथ या स्पर्धकांनी घरात केलेल्या एन्ट्रीमुळे घरातील समीकरणंही बदलल्याची पाहायला मिळाली होती. मात्र आता यातील दोन स्पर्धक बाहेर पडल्याने इतर स्पर्धक काय करतील हे येत्या भागांमध्ये कळलेच.