Marathi Celebrity Couple New Car : आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठी कलाविश्वातील अशाच एका सेलिब्रिटी जोडप्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. या जोडप्याने यंदा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन घर घेतल्याचं सर्वांना सांगितलं होतं. आता या दोघांच्या घरी नुकतंच नव्या गाडीचं आगमन झालं आहे. याची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे. ही जोडी नेमकी कोण आहे पाहुयात…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत नम्रता देसाई ही भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री मधुरा जोशीने नुकतीच नवीन गाडी खरेदी केली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये नम्रता व तिच्या पतीने हक्काचं पहिलं घर सुद्धा घेतलं होतं.
नव्या गाडीचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अभिनेत्री लिहिते, “गणपती बाप्पा मोरया…आमची पहिली गाडी फायनली आमच्या घरी आलेली आहे. ते म्हणतात ना…पहिली गोष्ट कायम खास असते…ही आम्ही दोघांनी घेतलेली पहिली गाडी आहे” मधुरा जोशी व तिचा पती अभिनेता गुरु दिवेकर या दोघांनी मिळून ही गाडी घेतली आहे.
गुरु दिवेकर सध्या ‘झी मराठी’वरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सोहमची भूमिका साकारत आहे. मधुरा आणि गुरु यांची ओळख ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. नंतर हळुहळू दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
दरम्यान, मधुराने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मेघा धाडे, सुलेखा तळवलकर, संग्राम समेळ, तेजस बर्वे, माधवी निमकर, स्वाती चिटणीस, सुकन्या मोने, रेवती लेले, समीर चौघुले यांनी कमेंट्स करत या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.
