Marathi Serial TRP Updates : मराठी टेलिव्हिजन विश्वात गेली अडीच वर्षे जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली-अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लव्हस्टोरी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी सुरुवातीपासून खूपच चांगला आहे. सध्या या मालिकेत अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय.

मालिकेच्या हटके कथानकामुळे दर आठवड्याप्रमाणे यावेळीही ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. यानंतर जानकी-हृषिकेशच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचा क्रमांक लागतो. तर, तिसऱ्या व चौथ्या स्थानावर अनुक्रमे ‘कोण होतीस तू काय झालीस तू!’ आणि ‘नशीबवान’ या मालिका आहेत.

टॉप-१० मालिकांच्या यादीत ‘झी मराठी’च्या कमळी मालिकेला आठवं स्थान मिळालं आहे. या मालिकेत सध्या कॉलेज इलेक्शनचा सीक्वेन्स चालू आहे आणि यामध्ये कमळी अनिका विरोधात उभी राहिली आहे. आता या इलेक्शनमध्ये अनिका की कमळी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय फक्त वाहिनीपुरता विचार केला तर ‘कमळी’ ही ‘झी मराठी’ची टीआरपी टॉपर मालिका ठरली आहे. यानंतर ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचा क्रमांक लागतो.

मराठी मालिकांचा टीआरपी

१. ठरलं तर मग – ५.७
२. घरोघरी मातीच्या चुली – ४.८
३. कोण होतीस तू काय झालीस तू! – ४.७
४. नशीबवान – ४.४
५. लक्ष्मीच्या पाऊलांनी – ४.३
६. तू ही रे माझा मितवा – ४.२
७. लग्नानंतर होईलच प्रेम – ४.०
८. कमळी – ३.८
येड लागलं प्रेमाचं – ३.८
९. लक्ष्मी निवास – ३.५
१०. लक्ष्मी निवास ( ८:३०-९:०० ) – 3.4

दरम्यान, ‘ठरलं तर मग’च्या आगामी भागात साक्षी शिखरे महिपतच्या मदतीने कट रचून जेलमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या नवीन ट्विस्टमुळे ‘ठरलं तर मग’च्या टीआरपीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. याशिवाय ‘झी मराठी’वर नव्याने सुरू झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या मालिकांना टीआरपीच्या यादीत ३.१ रेटिंग मिळालं आहे. तर लवकरच ऑफ एअर होणाऱ्या ‘अबोली’ मालिकेने रात्री ११ च्या स्लॉटला सुद्धा २.५ टीआरपी आणत रेकॉर्ड केला आहे.