‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी वाहिनीवरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील यश-नेहाची जोडी आणि परीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सध्या मालिकेचं कथानक रंजक वळणावर आहे. यश आणि नेहाच्या गाडीला अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

मिथिलाच्या अपघाताची बातमी ऐकताच यशचा गाडीवर ताबा सुटून त्यांचाही अपघात होतो. या जीवघेण्या संकटातून यश तर बचावतो. मात्र नेहा अजूनही बेपत्ता असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या मालिकेच्या येणाऱ्या भागाचा नवा प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये नेहा कशी सापडत नाहीये याबद्दल आजोबा बोलत असताना पोलीस अधिकारी जंगलात नेहाचं ब्रेसलेट मिळाल्याचं दाखवतात. आता नेहा सापडणार की नाही? चौधरी कुटुंब नेहाला गमावणार का?, हे मालिकेच्या येणाऱ्या भागात कळेल. परंतु, मालिकेतील या कथानकामुळे प्रेक्षक नाखुश असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा >> Video : हार्दिक-अक्षयाची लगीनघाई! राणादाने विणली पाठक बाईंसाठी लग्नाची साडी, पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रस्त्यावरील छोट्या मुलीला पैसे दिल्यानंतर दुसरा मुलगाही काजोलच्या गाडीमागे धावला अन्…; पाहा व्हिडीओ

झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रेक्षक कमेंट करत नेहाला मालिकेत परत आणण्याची मागणी करत आहेत. एका चाहत्याने “नेहा मालिकेतून बाहेर नको पडू प्लीज. नाहीतर मालिका कंटाळवाणी होईल. मालिका खूप छान सुरू होती. आता रडवू नका प्लीज”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत “नेहा परत यायला पाहिजे. नाहीतर मालिका चांगली वाटणार नाही”, असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने “नेहाला लवकर परत आणा”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा >> Video : …अन् कतरिना कैफच्या चाहतीसाठी विकी कौशलच बनला फोटोग्राफर, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहाची तर अभिनेता श्रेयस तळपदे यशची भूमिका साकारत आहेत. मालिकेतील लाडक्या परीच्या भूमिकेत बालकलाकार मायरा वायकूळ आहे. यातील सगळीच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.