टीव्ही वरील सर्वात वादग्रस्त पण लोकप्रिय कार्यक्रम अशी ओळख असलेल्या बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन ट्रॉफीवर आपलं नाव कोरत यंदाच्या पर्वाचा विजेता झाला. सोशल मीडियावरुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. बिग बॉस १६ चं विजेतेपद जिंकल्यानंतर एमसी स्टॅन सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी प्रियांका बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव आणि एमसी स्टॅन यांच्यापैकी कोणतरी एक विजेता होणार असं दिसत होतं आणि यात एमसी स्टॅनने बाजी मारली. बिग बॉस १६ जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.

आणखी वाचा- Bigg Boss 16 Grand Finale : ‘बिग बॉस’चा विजेता होताच पुण्याचा एमसी स्टॅन झाला मालामाल, ट्रॉफीसह मिळाली इतकी रक्कम

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एमसी स्टॅनने लिहिलं, “आम्ही इतिहास रचला, नेहमीच खरं वागलो, नॅशनल टीव्हीवर रॅप हिपहॉप केलं. आईचं स्वप्न पूर्ण झालं आणि ट्रॉफी पी-टाऊनमध्ये आली. ज्याने ज्याने प्रेम दिलं त्या प्रत्येकाचा त्यावर हक्क आहे. शेवटपर्यंत एमसी स्टॅन.” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चाहत्यांचे आभार मानले. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- पुण्यात मुस्लीम कुटुंबात जन्म अन् कव्वालीचं वेड; २३ व्या वर्षी Bigg Boss 16 जिंकणाऱ्या MC Stan बद्दल जाणून घ्या

View this post on Instagram

A post shared by MC STΔN ? (@m___c___stan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान एमसी स्टॅनला बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याबरोबरच त्याच्यावर इतर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. एमसी स्टॅनला ३१ लाख ८० हजार ही रक्कम देण्यात आली. त्याबरोबरच त्याला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली.